सिडको भूखंड घोटाळा, रोहित पवारांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर केले गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांना भेटीची मागितली वेळ

आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मी कधीही पुराव्यांशिवाय आरोप करत नाही. सिडको प्रकारणात मंत्री संजय शिरसाठ साहेब यांनी बिवलकर कुटुंबाला ज्या बेकायदा पद्धतीने भूखंड देण्याचा निर्णय घेतला. त्याचे सर्व पुरावे पत्रकारांना दिले आहेत. आपणही भेटीची वेळ द्यावी, आपल्यालाही याबाबतचे सर्व पुरावे दिले जातील. आपण अभ्यासू आहात हे मान्य करतो. त्यामुळं मी दिलेले पुरावे अभ्यासल्यानंतर आपण स्वतःहूनच या भ्रष्टाचारी मंत्र्याची हकालपट्टी केल्याशिवाय राहणार नाहीत.

रोहित पवार यांनी आपल्या X अकाऊंटवर मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून लिहिले, “आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मी कधीही पुराव्यांशिवाय आरोप करत नाही. सिडको प्रकारणात मंत्री संजय शिरसाठ साहेब यांनी बिवलकर कुटुंबाला ज्या बेकायदा पद्धतीने भूखंड देण्याचा निर्णय घेतला. त्याचे सर्व पुरावे पत्रकारांना दिले आहेत. आपणही भेटीची वेळ द्यावी, आपल्यालाही याबाबतचे सर्व पुरावे दिले जातील. आपण अभ्यासू आहात हे मान्य करतो. त्यामुळं मी दिलेले पुरावे अभ्यासल्यानंतर आपण स्वतःहूनच या भ्रष्टाचारी मंत्र्याची हकालपट्टी केल्याशिवाय राहणार नाहीत..”

रोहित पवार यांनी पुढे म्हणाले आहेत की, “शिवाय याच जागेबाबत आम्ही आणखी काही कागदपत्रांची मागणी सिडको आणि विधी व न्याय विभागाकडं केली आहे. यामध्ये दडवण्यासारखं काहीही नसेल तर ही कागदपत्रंही तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना आपण संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात, ही विनंती.”

प्रकरण काय आहे?

रोहित पवार यांनी सिडकोच्या भूखंड वाटपात अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. त्यांचा दावा आहे की, मंत्री संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला बेकायदा पद्धतीने भूखंड वाटप केले. या प्रकरणातील कथित गैरव्यवहारांचे पुरावे पवार यांनी पत्रकारांना सादर केले असून, ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरही मांडण्यास तयार आहेत.