हजारो कोटींचे हवाला रॅकेट; भोंदूबाबा खरातचे धागेदोरे थेट दुबई-ऑस्ट्रेलियापर्यंत, रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे रोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत. अशोक खरात याच्या संपर्कात राज्यातील कोणते नेते होते आणि त्यांच्यात किती वेळा संभाषण झाले याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शुक्रवारी दिली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठा आरोप केला आहे. अशोक खरात याचे धागेदोरे थेट दुबई-ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचले असून त्याच्या माध्यमातून हवाल्याचे पैसे परदेशात पाठवले जात होते असा दावा रोहित पवार यांनी शनिवारी एक्स पोस्ट करून केला.

भोंदू खरात ऑस्ट्रेलिया, दुबई यासह चार पाच देशात हवालाच्या माध्यमातून मनी लॉण्डरिंग करत असल्याची तसंच खरातने भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे हजारांहून अधिक कोटी या देशांमध्ये पाठवले असल्याचं कळत आहे. खरात हा केवळ भोंदू नाही तर एक मोठे नेक्सस आहे, त्यामुळे या प्रकरणाची केंद्रीय संस्थानी सुद्धा चौकशी करणे गरजेचे आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

चाकणकरांचे 177, शिंदेंचे 17, तटकरेंचे 8 कॉल्स… खरातच्या संपर्कात कोण कोण? अंजली दमानियांनी कॉल रेकॉर्ड्स बाहेर काढले

हा विषय राष्ट्रीय सुरक्षेला सुद्धा आवाहन देणारा असल्याने राज्य सरकारकडे पुरेसे पुरावे आले असतील तर गृह विभागाने देखील या प्रकरणाचा राजकीय गोळाबेरजेसाठी वापर न करता सखोल चौकशी केली पाहिजे. असो! या प्रकरणातही ED सारख्या यंत्रणांना जाग येईल, ही अपेक्षा! असेही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.