
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ते जनतेला नवीन आश्वासनं देत आहेत. त्यावर लाडक्या बहिणींचा आणि शेतकऱ्यांचा किती अंत बघणार? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करून म्हटले आहे की, युती सरकारची खोटी आश्वासने रेकॉर्ड करून स्टोरेज संपलं… लिहून पेनांची शाई संपली… कागदं संपली.. परंतु खोट्या आश्वासनांचा पाऊस मात्र अजून ओसरायचं नाव घेत नाही…..
देवाभाऊ अजून किती अंत बघणार आमच्या शेतकऱ्यांचा? लाडक्या बहिणींचा? आणि युवांचा? असेही रोहित पवार म्हणाले.
युती सरकारची खोटी आश्वासने रेकॉर्ड करून स्टोरेज संपलं… लिहून पेनांची शाई संपली… कागदं संपली.. परंतु खोट्या आश्वासनांचा पाऊस मात्र अजून ओसरायचं नाव घेत नाही…..#देवाभाऊ अजून किती अंत बघणार आमच्या शेतकऱ्यांचा? लाडक्या बहिणींचा? आणि युवांचा?@Dev_Fadnavis#खोटी_आश्वासने… pic.twitter.com/bRdKiykXWU
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 17, 2025

































































