
पुणे जिह्यात कोयते उगारून दहशत माजविणे तसेच गाड्यांची मोडतोड अशा प्रकारच्या घटनांत वाढ झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अशाच एका घटनेचा व्हिडीओ ‘हा बघा कोयता गँगचा थरार’ असे म्हणत सोशल मीडियावर शेअर केला आहे.
विधानसभा अधिवेशनात वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी ‘कोयता गँग’च्या दहशतीकडे सरकारचे लक्ष वेधले होते, यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांनी पुण्यात ‘कोयता गँग’ अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले होते. माध्यमांनी हे नाव दिल्याचे म्हटले होते. याचा संदर्भही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये देत पुण्यात दिवसेंदिवस होत असलेल्या गंभीर स्थितीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
व्हिडीओमध्ये काय आहे?
रोहित पवार यांनी शेअर केलेला व्हिडीओ हा पुण्यातील बिबवेवाडी भागातील आहे. या व्हिडीओत वर्दळीच्या रस्त्यावर दोन गटांत राडा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.