‘रुद्रम 4’ चा रुद्रावतार; ताशी 6 हजार किमी वेग, 1500 किमीची रेंज, ‘सुखोई 30एमकेआय’वरून काळ बनून कोसळणार

ऑपरेशन सिंदूर’नंतर हिंदुस्थान आपली डिफेन्स सिस्टीम अद्ययावत  करत आहे. मिसाईलपासून ड्रोन, फायटर जेट, एअर डिफेन्स सिस्टीम अशी प्रत्येक बाजू मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर डीआरडीओ पहिल्यापेक्षा घातक मिसाईल विकसित करत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनलेली ही मिसाईल सामान्य रडार आणि डिफेन्स सिस्टीमला चकवा देणारी आहेत. रुद्रम 4 हे त्यापैकीच एक खतरनाक असे शत्रूची झोप उडवणारे मिसाईल आहे. डीआरडीओ रुद्रम प्रोजेक्टअंतर्गत हायपरसोनिक मिसाईल विकसित करत आहे. त्याचा वेग ताशी 6 हजार किमीपेक्षा जास्त असेल. त्याची रेंज 1000 ते 1500 किमी असेल. पाकिस्तानचा बहुतांश भाग या मिसाईलच्या रेंजमध्ये येईल. हायपरसोनिक मिसाईलला ‘रुद्रम 4’ असे नाव देण्यात आले आहे.

‘रुद्रम 4’ ही हायपरसोनिक मिसाईल म्हणजे हिंदुस्थानची संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) मोठे यश ठरेल. हे मिसाईल हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. वायुदलाची मारक क्षमता कैक पटीने वाढावी यादृष्टीने त्याला   डिझाईन करण्यात आले आहे.

‘रुद्रम 4’ ची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचा हायपरसोनिक स्पीड, जो मॅक 5 पेक्षा अधिक आहे. प्रचंड वेगामुळे पारंपरिक रडार आणि मिसाईल डिफेन्स सिस्टीम त्याला ट्रक किंवा अडवायला असमर्थ ठरेल. शत्रूला प्रतिहल्ला करायला अवघी काही सेकंदे मिळतात.

‘रुद्रम 4’ ची मारक क्षमता रडार, बंकर उद्ध्वस्त करू शकतील. जिथे क्रूझ किंवा बॅलेस्टिक मिसाईल प्रभाव पाडू शकत नाही, तिथे रुद्रमचा रुद्रावतार दिसून येईल.

प्राथमिक अहवालानुसार, ‘रुद्रम 4’ची मारक क्षमता 300 ते 1500 किमी एवढी असू शकते.

फायटर जेटवर तैनात

‘रुद्रम 4’ काही फायटर जेटवर तैनात केले जाऊ शकते. सध्या त्याला सुखोई 30एमकेआयवर इंटिग्रेट करण्याची योजना आहे. मिराज 2000 आणि राफेलवरदेखील रुद्रम 4 तैनात करण्यात येईल की नाही, यावर अभ्यास सुरू आहे. वजनाने हलके असल्याने एकापेक्षा जास्त मिसाईल फायटर जेटमधून वाहून नेता येतील. यामध्ये इनर्शिअल नेविगेशन सिस्टीम, जीपीएस आधारित अपडेट, शेवटच्या टप्प्यात इमेजिंग इफ्रारेड सीकर लावण्याची शक्यता आहे.