
अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू झालेल्या युद्ध कधी थांबेल ते सांगता येत नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. यातच आता इस्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचा देखील मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र सोशल मीडियावर पसरलेल्या बातम्यांचे नेत्यानाहू यांच्या कार्यालयाने (PMO) जोरदार खंडन केले आहे. नेतान्याहू यांची प्रकृती उत्तम असून ते सुरक्षित आहेत, असे अधिकृत निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या काही तासापासून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बेंजामिन नेतान्याहू यांच्या प्रकृतीबाबत आणि निधनाबाबतच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, या सर्व बातम्या ‘निराधार आणि खोट्या’ असल्याचे इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. “पंतप्रधान नेतान्याहू यांची प्रकृती अगदी व्यवस्थित (Fine) असून ते त्यांचे दैनंदिन कामकाज नेहमीप्रमाणे करत आहेत.”



























































