रुपया शतकाकडे झेपावला!

rupee-fall

देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचा दावा मोदी सरकार करत असताना आज रुपयाने पुन्हा धक्का दिला. डॉलरच्या तुलनेत आणखी महाग होत रुपया शतकाकडे झेपावला. आज 25 पैशांनी कमकुवत होऊन रुपया 90.21 वर पोहोचला. ही घसरण अशीच सुरू राहिल्यास लवकरच एका डॉलरसाठी 100 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. त्याचा फटका एकूणच अर्थव्यवस्थेला बसणार आहे. दरम्यान, उद्या रिझर्व्ह बँक आपले पतधोरण जाहीर करेल. यावेळी रेपो दर कमी होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन रोखणे हे रिझर्व्ह बँकेपुढे मोठे आव्हान आहे.