पायलटांनी भाजप विमान चुकवले, हे कसलेही ‘व्यवहारी’ राजकारण नव्हते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पक्ष नेतृत्वाकडे मी कसलेही पद मागितलेले नाही आणि माझ्या बंडात कसलेही ‘व्यवहारी’ राजकारण नव्हते, असे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी मंगळवारी सांगितले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकवल्यानंतर सचिन पायलट महिनाभर दिल्लीतच मुक्कामाला होते. मंगळवारी त्यांचे जयपुरात आगमन झाले. त्या वेळी निवासस्थानाबाहेर त्यांच्या कॅम्पमधील आमदार व समर्थकांनी गर्दी केली होती.

sachin-pilot-again-in-congr

पत्रकारांशी बोलताना पायलट म्हणाले, माझ्याविरुद्ध जी काही वक्तव्ये करण्यात आली त्यामुळे मला धक्काच बसला आहे. त्यामुळे मी दुःखी तर झालोच, पण मी मंगळवारीपर्यंत पक्षविरोधात एकही वाक्य उच्चारलेले नाही हे लक्षात ठेवा. राजकारणात तुमच्या वैयक्तिक दुःखाला स्थान नसते हे जेवढे खरे आहे तेवढेच येथे ‘व्यवहार’ही करू नयेत असे आपल्याला वाटते, असेही पायलट म्हणाले. राजस्थानचे विधीमंडळ अधिवेशन 14 ऑगस्टपासून सुरू होत असून काल सोमवारी पायलट यांनी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपले भाजपच्या दिशेने जाणारे विमान माघारी घेतले.