100 ग्रॅम वजन अधिक भरल्याने अंतिम सामन्या आधी कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले होते. त्या निर्णयाविरोधात विनेशने आंतरराष्ट्रीय क्रिडा लवादाकडे दाद मागितली असून आज रात्री यावर निर्णय देण्यात येणार आहे. विनेशने तिच्या याचिकेत रौप्य पदक संयुक्तरित्या मिळावं अशी मागणी केली आहे. तिच्या या मागणीला जगप्रसिद्ध क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील पाठिंबा दिला आहे. सचिने तेंडुलकर X या सोशल साईटवर एक पोस्ट शेअर करत त्याचा संताप व्यक्त केला आहे.
#VineshPhogat #Paris2024 #Olympics @WeAreTeamIndia pic.twitter.com/LKL4mFlLQq
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 9, 2024
”आता अंपायरच्या निर्णयाची वेळ! प्रत्येक खेळाचे नियम असतात. ते नियम पाळताना मागचा पुढचा संदर्भ देखील बघितला गेला पाहिजे. विनेश फोगाट ही अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. मात्र अंतिम सामन्याआधी वजनामुळे ती अपात्र ठरली व विनेशच्या हक्काचं रौप्य पदक लुटलं गेलं. आपला खेळ तांगला करण्यासाठी उत्तेजकं घेतल्यानंतर जर एखाद्या खेळाडूला अपात्र ठरवले गेले असते तर ते समजण्यासारखे असते. अशा परिस्थितीत, कोणतेही पदक न देणे आणि शेवटचे स्थान देणे योग्य ठरले असते. मात्र, विनेशने तिच्या प्रतिस्पर्ध्यांवरमात करत अव्वल दोघांमध्ये स्थान पटकावले. ती नक्कीच रौप्य पदकास पात्र आहे. आम्ही सर्व क्रीडा लवादाच्या न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहोत. विनेशच्या बाजूने निकाल लागावा व तिच्या हक्काचं रौप्य पदक तिला मिळावे”, अशी पोस्ट सचिन तेंडुलकरने केली आहे.