नवशिक्यांसाठी हिंदुस्थानातील सुरक्षित ट्रेक्स, निसर्गाच्या सोबतीने रोमांचक अनुभवांचे साक्षीदार व्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात प्रत्येक प्रातांची एक खासियत आहे. हिमालयातील उंच पर्वतरांगा, हिरवीगार जंगले आणि पश्चिम घाटातील डोंगरदऱ्या — ट्रेकिंग प्रेमींसाठी मोठे आकर्षण आहे. विशेष म्हणजे, ट्रेकिंगमध्ये नवीन असणाऱ्यांसाठीही हिंदुस्थानात अनेक सोपे आणि सुरक्षित हायकिंग मार्ग उपलब्ध आहेत. या ट्रेकसाठी विशेष तांत्रिक कौशल्य किंवा अत्यंत शारीरिक तंदुरुस्तीची गरज नसते. जर तुम्ही ट्रेकिंगमध्ये नवखे असाल आणि उगवता सूर्योदय, जंगलातील पायवाटा आणि हिरव्यागार पठारांचा अनुभव घ्यायचा असेल, तर हे ट्रेक तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.

त्रिऊंड ट्रेक हा हिमालयातील सर्वात लोकप्रिय ट्रेक मानला जातो. खासकरुन नवशिक्यांसाठी हा ट्रेक खूप महत्त्वाचा आहे. या ट्रेकची उंची सुमारे 2,850 मीटर असून, या ट्रेकला जाण्यासाठी सर्वोत्तम काळ हा मार्च ते जून मानला जातो. त्रिऊड ट्रेक हा भारतातील नवशिक्यांसाठी सर्वात लोकप्रिय ट्रेकपैकी एक मानला जातो. हा ट्रेक धौलधार पर्वतरांगासाठी प्रसिद्ध आहे. हा ट्रेक मॅकलोडगंज येथून सुरु होतो आणि सुमारे पाच ते सहा किमीचा हा ट्रेक आहे. मार्ग सुस्पष्ट, हळूहळू चढणारा आणि सुरक्षित असल्यामुळे तो आठवड्याभरात सहज पूर्ण करता येतो. वर पोहोचल्यावर दिसणारे बर्फाच्छादित पर्वत आणि ढगांमधील दृश्य ट्रेकर्ससाठी अविस्मरणीय अनुभव ठरते.

नाग टिब्बा ट्रेक हा देखील हिमालयातील महत्त्वाचा ट्रेक मानला जातो. उत्तराखंडमधील हा ट्रेक सुमारे 3,022 मीटर उंचीचा आहे. सर्पाचे शिखर म्हणून ओळखले जाणारे नाग टिब्बा हे गढवाल हिमालयातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. हा ट्रेक नवशिक्यांसाठी विशेष लोकप्रिय आहे. मार्ग हिरव्यागार जंगलातून जातो आणि हळूहळू उंची वाढत जाते. त्यामुळे ट्रेक करताना हिमालयातील निसर्ग, शांत वातावरण आणि बर्फाच्छादित शिखरांचे सुंदर दृश्य अनुभवता येते. पहिल्यांदाच हिमालयात ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हा ट्रेक आदर्श मानला जातो.