कोरोनाकाळात निम्म्यातच खंडित केलेली ‘सह्याद्री एक्प्रेस’ आता लवकरच कोल्हापूरहून थेट मुंबईपर्यंत धाकणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हालचाली सुरू असून पुणे विभागाकडून यासंदर्भातील प्रस्ताक रेल्वे (बोर्ड) मुख्यालयाला पाठविण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने कोरोनाकाळात ‘सह्याद्री एक्प्रेस’ची सेवा खंडित केली होती. कोरोना संपल्याकर ही गाडी पुन्हा सुरू करण्यात आली, मात्र ही गाडी कोल्हापूरहून पुणे रेल्वे स्थानकापर्यंतच धाकत होती. यामुळे मुंबईला जाऊ इच्छिणाऱ्या कोल्हापूरकरांना पुण्यात उतरून दुसऱ्या गाडीचा पर्याय शोधावा लागत होता. मात्र आता पुणे विभागाने ‘सह्याद्री एक्प्रेस’ गाडी मुंबईपर्यंत चालविण्याचे नियोजन केले आहे. त्या नियोजनानुसार ही गाडी श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईपर्यंत चालकिण्यासाठी रेल्वे बोर्डाला प्रस्ताव देण्यात आला आहे.