पुढच्या वेळी कायदेशीर कारवाई करेन… साई पल्लवी नेटकऱ्यांवर संतापली

गेल्या काही दिवसांपासून रामायण सिनेमात सीतेच्या भूमिका साकारत असलेली अभिनेत्री साई पल्लवीने मांसाहार सोडल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चां सुरु आहे. पण या चर्चांवर साई पल्लवीने मौन सोडत ती नेटकऱ्यांवर चांगलीच संतापली आहे. तिने थेट पुढच्या वेळी गॉसिपच्या नावाखाली वाटेल ते पसरवल्यास कायदेशीर कारवाई करणार असा इशारा  सोशल मीडियावर पोस्ट शेअर दिला आहे.

साई पल्लवी आपल्या सोशल मिडिया अकाऊंट एक्सवर म्हणाली की, अनेकदा मी निराधार अफवा, खोट्या बातम्या, चुकीची वक्तव्य ऐकते त्यावेळी मी शांत राहणे पसंत करते आणि अशावेळी काही बोलतच नाही. पुढे ती म्हणाली, मी विशेष करुन सिनेमा रिलीज, घोषणा किंवा माझ्या कामाशी संदर्भातील काही आठवणी संदर्भातील अफवांबाबत मी कायम शांत राहते. मात्र पुढच्या वेळी ज्यावेळी प्रसिद्ध प्रकाशन, मिडिया किंवा व्यक्ती बातम्या आणि गॉसिपच्या नावाने वाटेल त्या गोष्टी चालवताना पाहिल्या तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करेन. बस असे म्हटले आहे.

साई पल्लवी दिग्दर्शक नितेश तिवारी याचा रामायणात सीतेची भूमिका साकारत आहे तर रणबीर कपूर रामाची भूमिका साकारत आहे.तर केजीएफ स्टार यश रावणाची भूमिका साकारण असून लारा दक्का कैकयीची भूमिका निभावणार आहे. तर सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.