साऊथ चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध जोडपं अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्य यांचा काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटामुळे चाहते तर नाराज झालेच पण यामुळे तेलंगणातील वातावरण देखील तापलं आहे. या दोघांच्या घटस्फोटावर तेलंगणाच्या कॅबिनेट मंत्री कोंडा सुरेखा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी नागा चैतन्यने मंत्री कोंडा सुरेखा यांच्यावर फौजदारी मानहानीचा शंभर कोटी रुपयांचा खटला दाखल केलाय.
अभिनेत्री समंथा रूथ प्रभू व तिचा पूर्वपती नागा चैतन्य या दोघांनीही या प्रकरणावर रोष व्यक्त केला होता. नागार्जुन यांनी सोशल मीडियावरही पोस्ट शेअर करत याबाबत प्रतिक्रिया दिली होती. यानंतर त्यांने तेलंगणाच्या काँग्रेस नेत्या कोंडा सुरेखा यांचा विरोधात मानहानीचा 100 कोटींचा खटला दाखल केला. त्यामुळे सध्या राजकारण तापलं आहे.
दरम्यान, समांथा आणि नागा चैतन्य यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर कोंडा सुरेखा यांनी गुरुवारी त्यांचे वक्तव्य मागे घेतलाचे म्हटले होते. यानंतर सिने इंडस्ट्रीत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र कोंडा सुरेखा यांनी मागितलेली माफी ही नागा चैतन्य यांने नाकारली आहे. हे प्रकरण आता वैयक्तिक राहिले नसल्याचं नागा चैतन्य यांने स्पष्ट केले आहे.
अभिनेता नागा चैतन्यने टाइम्स नाऊला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने या प्रकरणावर भाष्य केलं. मंत्र्यांनी केलेली निंदा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. यापुढे आम्ही मनोरंजन व्यवसायात सॉफ्ट टारगेट राहणार नाही. स्वतःच्या राजकीय फायदांसाठी सेलिब्रिटींची नावे वापरू शकत नाहीत. मला आशा आहे की त्या महिलेविरुद्धची आमची कायदेशीर कारवाई इतर राजकारणांना आमच्या नावाचा अयोग्य वापर करण्यापासून सावध करेल असे तो यावेळी म्हणाला.