
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सध्या तयार भात शेती धोक्यात आली आहे. गणपती नंतर खर तर हळवी भात शेती कापण्यायोग्य झाली होती.गणपती उत्सवानंतर वातावरणात देखील बदल पाहायला मिळत होता.परंतु अगदी पुढच्या चारच दिवसात पुन्हा संततधार सुरु झाल्याने तयार भात शेती पावसात भिजत पडली आहे.
गेले पाच महिने बरसणाऱ्या पावसाने,भात कापणीवेळी देखील ठिय्या मांडल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे.सतत च्या वाढत्या पावसामुळे ओढ्यानसह,नद्यांच्या पाणी पात्रात लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळत आहे.भात शेतीत पाणी तुंबले आहे.जराही उघडीप मिळत नसल्याने भात कापणी कशी करायची या चिंतेत सध्या शेतकरी वर्ग पडला आहे.
यातच भातशेती तयार असल्याने,रात्रीचे वेळी डुक्करांकडून भात शेतीचे मोठे नुकसान होत आहे.भाताच्या लोंबी खाऊन,शेतात लोळून भात शेती जमीन दोस्त झालेली पाहायला मिळत आहे.संगमेश्वर तालुक्यात् बहुतांश शेती ही डोंगराळ भागात असल्याने, डुक्करांकडून शेतीच्या होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण हे मोठे आहे.असाच पाऊस काही दिवस बरसत राहिला तर हळव्या पिका पाठोपाठ उशिरा तयार होणारी,महान भात शेती देखील संकटात येण्याची चिन्ह आहेत.































































