नीलम गोऱ्हे यांचे सांगलीच्या नगर वाचनालयासाठी 5 लाख,अंकली हे गाव दत्तक घेणार

542

सांगलीत आलेल्या महापुरात येथील नगरवाचनालयातील पुस्तकांचा, ग्रंथांचा अक्षरशः लगदा झाला. हे वाचनालय पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. तसेच गावकऱ्यांनाही धीर देण्याची आणि त्यांच्या आयुष्याला नवी उभारी देण्याची गरज आहे. ही बाब हेरून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगलीच्या नगरवाचनालयासाठी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. तसेच अंकली हे गाव दत्तक घेत असल्याची घोषणाही केली.

डॉ. गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पूरस्थिती, पुरानंतर उद्भवणाऱ्या समस्या आणि उपाययोजनांच्या अनुषंगाने धान्यवाटप, मदत, सानुग्रह अनुदान आदींबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, शिवसेना संघटक बजरंग पाटील, जिल्हाप्रमुख विभूते संजय, महिला माजी जिल्हा संघटक सुनीता मोरे, दिगंबर जाधव, पुणे शहर संघटक संतोष गोपाळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या