सॅनिटायझरचा अतिवापर मोबाईलसाठी घातक, सततच्या स्प्रे फवारणीमुळे नादुरुस्तीचे प्रमाण वाढले

1144

कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी विविध स्तरावर काळजी घेण्यात येत आहे. हस्तांदोलन, एकमेकांना टाळी देणे टाळले जात आहे. सॅनिटाईझ करणे, मास्क वापरणे व्यक्तीच्या शरीराचे तापमान, ऑक्सिजन मोजणे यासारख्या उपाययोजना केल्या जात आहेत. विशेषत: सॅनिटायझरचा अधिक वापर करण्यात येत आहे. कित्येकदा आपण वापरत असलेल्या वस्तू जसे की गॉगल, चष्मा, गाडी- घराची चावी, मोबाइलही सॅनिटाईझ केले जातात. सॅनिटायझरचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. तसेच मोबाईलवर अति सॅनिटायझर वापरल्याने मोबाईल नादुरुस्त किंवा बाद होण्याचे प्रमाण वाढत आहे.

मोबाईल हा सध्याच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झालेला आहे. तर सध्याची परिस्थिती पाहता मोबाईल वापरणे हे धोकादायक ठरू शकते. कारण मोबाईलवरही अनेक विषाणू जमा होऊन त्यांच्यापासून रोगाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोबाईलही सॅनिटाईझ करण्यात येत आहेत.  परंतु मोबाईलवर सॅनिटाईझच्या अतिवापरामुळे मोबाईल नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेषत:  ‘जेल’पेक्षा स्प्रेचा वापरामुळे मोबाईल नादुरुस्त होत आहेत किंवा बंद पडत आहेत. मोबाईलवर सॅनिटाईझर स्प्रेचा अति वापर केल्यामुळे त्याचे डिस्प्ले बंद पडतात. तसेच टचवर्कही काम करत नाही. माईकही खराब होतो, सॉकेटमध्ये सॅनिटाईझर गेल्याने ते निष्क्रिय होते. तर बॅटरीमध्ये गेल्यास असती पूर्ण भाग खराब होते. अनेकदा मदरबोर्ड बदलावा लागतो तसेच स्पीकर हेडफोन नाही खराब होतात. आतापर्यंत असे अनेक मोबाईल दुरुस्ती साठी आल्याची माहिती मोबाइल विक्रेते राज वर्मा यांनी दिली.

कशी घ्यावी काळजी

मोबाईल निर्जंतुक करण्यासाठी स्प्रे सॅनिटाईझरपेक्षा जेलचा वापर करावा. जेल हातावर किंवा कापडावर घेऊन त्याने मोबाईल पुसावा. शक्यतो स्वच्छतेसाठी आयपी क्लीनर वापरावे. साधारणतः 200ml ची बॉटल शंभर रुपयांपर्यंत मिळते. तसेच मोबाईल पाऊचही वापरासाठी फायदेशीर ठरतो, ते वॉटरप्रूफ असल्याने स्प्रे मारला तरी कोणतीही हानी होत नाही. तसेच हेडफोन, ब्लूटूथचा वापर करावा असेही राज यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या