मिंधे गटाच्या भ्रष्ट मंत्र्यांची ‘क्लस्टर’ चौकशी करा, संजय राऊत यांची मागणी

महायुती सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. जिथे भ्रष्टाचार आहे तिथे स्थगिती दिली जाते. फक्त मिंधे गटाच्या पाच मंत्र्यांची एसआयटी चौकशी केली तरी सर्व भ्रष्टाचार समोर येईल, क्लस्टरच्या नावाखाली मोठ्या इमारती बांधल्या जातात तशीच या भ्रष्ट मंत्र्यांची एकत्रित क्लस्टर चौकशी करा, अशी मागणी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारमधील भ्रष्टाचारावर तोफ डागली. मिंधे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्यावर भाजप आमदार परिणय फुके यांनी आरोप केले आहेत. संदीपान भुमरे यांनी दीडशे कोटींची जमीन ड्रायव्हरच्या नावावर केली. संजय शिरसाट, उदय सामंत यांचेही घोटाळे समोर आले आहेत. त्यांच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली पाहिजे, मोठी न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर त्यांनी भ्रष्टाचाराला मुक्त रान देणाऱया प्रत्येक प्रोजेक्टला स्थगिती दिली असती, असे ते पुढे म्हणाले.