”अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात एकही पुरावा नसताना ईडीने त्यांना अटक केली होती. ईडी ही मोदी शहांच्या हातातलं हत्यार बनलं आहे. ते त्यांच्या मदतीने दहशतवाद पसरवत आहेत’, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुराव्याअभावी दिल्लीतील पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आगे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी मोदी शहांवर सडकून टीका केली. ”अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही पुराव्याशिवाय अटक केली. केजरीवाल हे बेकायदेशीररित्या अटक झाल्यापासून तीन महिने तुरुंगात आहेत. आपचे अनेक नेते तुरुंगात आहेत. मुंबई महाराष्ट्रातले अनेक नेते कार्यकर्ते तुरुंगात आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन तुरुंगात आहेत. या कोणाही विरोधात पुरावा नसताना त्यांना तुरुंगात डांबले आहेच. पीएमएलए न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. कोर्टाने ईडीला विचारले की केजरीवालांविरोधात पुरावे कुठे आहेत. असेच माझ्या व अनिल देशमुखांच्या बाबतीत झाले केजरीवाल यांच्या विरोधात एकही पुरावा नव्हता तरीही ईडीने त्यांनाा अटक केली. ईडी ही अमित शहा व मोदींच्या सांगण्यावरून दहशतवाद पसरवत आहे. त्याला कोर्टाने चपराक लावली आहे. आता तरी ईडी सीबीआय सुधारणार का? देशाच्या जनतेने मोदींविरोधात, त्यांच्याी हुकमशाही विरोधात एक जनादेश दिला आहे. मोदी शहांनी लोकतंत्रला ईडी सीबीआयला पकडून त्याचे खेळणे केले आहे. हत्यार बनवलंय. आता तरी ईडी सीबीआय सुधारणार का? जनतेने इशारा दिला आहे की आता तरी सुधारा, असे संजय राऊत म्हणाले.
”अरविंद केजरीवाल हे अजूनही दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही कारण लोकांचा त्यांना कौल होता. अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेने या त्यांना यात गोवणाऱ्या सगळ्यांना चपराक बसली आहे. केजरीवाल यांचा दोष इतकाच की देशाच्या राजधानीत त्यांनी नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाचा वारंवार पराभव केला. त्यामुळे काही खोट्या प्रकरणाची उभारणी करून त्यांना अटक केली. तशीच मला अटक केली होती. गेल्या काही वर्षांपासून लोकशाहीचा डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे. त्यात ईडी सीबीआय ईनकमटॅक्सचा वापर होतोय, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
”2024 च्या निकालाने नरेंद्र मोदी यांची हुकुमशही संपविण्याचा निकाल दिला. ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरामुळेच त्यांना जनतेने बहुमत नाकारालं . ईडी सीबीआय निवडणूक आयोग यापासून बोध घेणार आहेत का? या सर्व संस्था कळसुत्री बाहुल्यांसारखे नाचताना दिसत आहेत. त्यामुळे जनतेने त्यांना कुबड्यांच्या आधारे सरकार स्थापन करायला भाग पाडले”, असे संजय राऊत म्हणाले.