‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाला देशभरातून वाचकांचा जबरदस्त प्रतिसाद, अवघ्या 7 दिवसांत 10 हजार प्रतींची विक्री

Narkatla Swarg book

भाजपच्या सुडाच्या राजकारणातून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊत यांना 100 दिवस आर्थर रोड कारागृहात काढावे लागले. त्या अनुभवांचं थरारक चित्रण असलेलं ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक संजय राऊत यांच्या लेखणीतून साकारलं असून प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात 17 मे राजी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. नरकातला स्वर्ग या पुस्तकाला देशभरातून वाचकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 7 दिवसांत या पुस्तकाच्या 10 हजार प्रतींची विक्री झाली आहे.

नरकातला स्वर्ग या पुस्तकाला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादासाठी संजय राऊत यांनी वाचकांचे आभार मानले आहेत. X वर एक पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, “नरकातला स्वर्ग, वाचकांचा जबरदस्त प्रतिसाद. मराठी माणसा, त्रिवार धन्यवाद! जय महाराष्ट्र!” दरम्यान, नरकातला स्वर्ग हे पुस्तक घरपोच ऑर्डर करण्यासाठी वाचक 8010924951 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करू शकतात.