राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती खेळाडू संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी

सामना ऑनलाईन । मुंबई

गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकणारी वेटलिफ्टर संजिता चानू उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे. संजिता चानूने ५३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले होते.

चानूच्या शरिरात टेस्टोस्टेरोन स्टेरॉयड हे उत्तेजक द्रव्य सापडले. यामुळे शरिरात जास्त शक्ती निर्माण होते. चानू उत्तेजण चाचणीत दोषी आढळल्याने तिला तात्पुरते निलंबित करण्यात आले. या प्रकरणात संपूर्ण चौकशी केल्यानंतर तिच्याबद्दल योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने दिली आहे.

या प्रकरणात दोषी आढळल्यास तिचे पदकही काढून घेण्यात येऊ शकते. यापूर्वी २०१४ च्या राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.