
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडला सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. त्यामुळे त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. बीड जिल्हा न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने जामीन नाकारल्यानंतर कराडने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. एम.एम. सुंदरेश यांच्यासमोर कराडच्या जामिनावर सुनावणी झाली.
या हत्ये प्रकरणी मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कराडला मकोका लागू होत नाही. त्याला जामीन मंजूर करावा, अशी मागणी ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी केली. कराडच्या जामिनाला पोलिसांनी विरोध केला. कराडवर एकूण 21 गुह्यांची नोंद आहे. त्याला जामीन मंजूर करताच येणार नाही, असा दावा पोलिसांनी केला. उभयतांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने कराडचा जामीन फेटाळला.
























































