वाल्मीक कराड शरण येईपर्यंत, झोपेचे सोंग घेणारे गृहखाते; खरचं संतोष देशमुखांना न्याय देऊ शकेल का? शिवसेनेचा सवाल

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी वाल्मीक कराड मंगळवारी सकाळी पोलिसांना शरण आला. पाषाण येथील सीआयडीच्या कार्यालयात त्याने आत्मसमर्पण केलं. मात्र वाल्मिक कराड सीआयडीला शरण आल्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

वाल्मीक कराड शरण येईपर्यंत, झोपेचे सोंग घेणारे गृहखाते, खरचं संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देऊ शकेल का? गुन्हेगाराला अटक करण्यात अपयशी ठरलेले गृहखाते, आरोपींच्या विरोधात पुरावे गोळा करण्यात अपयशी तर ठरणार नाही ना?, असे प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उपस्थित केले आहेत.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड सीआयडीला शरण आल्यावर उपस्थित झालेले प्रश्न –

1) तीन आठवडे महाराष्ट्राचं गृहखातं काय करत होतं?

2) वाल्मिक कराडला कोणाचं राजकीय संरक्षण होतं का?

3) अजून तीन फरार आरोपींचा शोध कधी घेणार?