
साताऱयातील शेतकरी पुत्राला लंडनमध्ये ब्रिटिश कौन्सिलतर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रभावशाली काम करणाऱया देशातील 75 युवकांचा सन्मान ब्रिटिश कौन्सिल आणि नॅशनल इंडियन स्टुडंट अँड अॅलूम्नी युनियन माध्यमातून लंडन येथे करण्यात आला. महाराष्ट्रातून प्रवीण निकम यांच्यासह चैतन्य मारपकवार, राजू केंद्रे आणि विवेक गुरव यांचाही सन्मान करण्यात आला आहे.