
एसबीआय क्रेडिट कार्डधारकांना कंपनीने जोरदार झटका दिला आहे. एसबीआय क्रेडिट कार्ड आणि पेमेंट सर्विसने मिनिमम अमाऊंट डय़ूच्या पद्धतीत बदल करण्याची घोषणा केली आहे. हे नियम 15 जुलैपासून बदलणार असून नव्या नियमानुसार, कार्डधारकांना आता दर महिन्याला आधीच्या तुलनेत जास्त पैसे द्यावे लागू शकतात. मिनिमम अमाऊंट डय़ू म्हणजे क्रेडिट कार्डमधील रक्कम होय. ज्याला कार्डधारकांना क्रेडिट कार्डवरून डय़ू डेटपर्यंत पैसे द्यायचे असतात. यामुळे क्रेडिट कार्ड खराब होत नाही.