
जोपर्यंत राज्य सरकारला खात्री होत नाही तोपर्यंत शाळा सुरू करून राज्यातील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला सरकारचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटकाळात राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. परीक्षा रद्द करा किंवा अभ्यासाला वेळ द्या, अशी मागणी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी करत आहेत. विद्यार्थ्यांच्या या मागणीला सरकारचा पाठिंबा असल्याचे अजित पवार म्हणाले.




























































