अमेरिकेला 100 फूट उंच त्सुनामीचा धोका

अमेरिकेच्या किनाऱ्यावर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या त्सुनामीची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. अगदी 100 फूट उंचीची त्सुनामी येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आलीय. प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्समध्ये प्रकाशित अभ्यासाने चिंतेत भर टाकली आहे. त्याला कॅस्केडिया थ्रेट असे नाव देण्यात आलेय. कॅस्केडिया सबडक्शन झोन ही उत्तर पॅलिकोर्निया ते कॅनडातील ब्रिटिश कोलंबियापर्यंत पसरलेले भूकंपीय क्षेत्र आहे.