
जम्मू-कश्मीरमध्ये घातपाताचा मोठा डाव उधळून लावण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. पूंछ परिसरामधून सुरक्षा दलाने स्फोटके जप्त केली आहेत. जेवणाच्या डब्यामध्ये ही स्फोटके लपवण्यात आली होती. या कारवाईदरम्यान अत्याधुनिक संवाद यंत्रेही हस्तगत करण्यात आली आहेत. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला असून सुरक्षा दल अखंड सावधान आहे. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांविरुद्ध शोधमोहीम सुरू असतानाच रविवारी सायंकाळी पूंछ जिल्ह्यात घातपाताचा मोठा कट उधळण्यात आला. सुरनकोट भागातील हरी मर्होटे गावामध्ये दहतवाद्यांचा एक अड्डा सुरक्षा दलाने उद्ध्वस्त करत स्फोटकं आणि इतर साहित्य जप्त केले. हिंदुस्थानी लष्कर आणि जम्मू-कश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
Jammu & Kashmir | Hideout busted in Hari Marote village in Surankot sector of Poonch district with recovery of five IEDs, say Poonch Police
(Source: Poonch Police) pic.twitter.com/HO36EbKPza
— ANI (@ANI) May 5, 2025
याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरनकोट येथील हरी मर्होटे गावामध्ये लष्कराकडून कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या दरम्यान नैसर्गिक गुहांमध्ये बनवण्यात आलेला दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. या ठिकाणाहून चार ते पाच आयईडी स्फोटकं, पावडर स्वरुपातील काही स्फोटक पदार्थ, संवादाची उपकरणं, कपडे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेली स्फोटके सुरक्षा दलाने घटनास्थळीच नष्ट केली असून दहशतवाद्यांविरुद्ध शोधमोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.