जनाबाई तारे यांचे निधन

भिवंडी तालुक्यातील खांडपे गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जनाबाई तारे यांचे 105 व्या वर्षी निधन झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्पप्रमुख साईनाथ तारे यांच्या त्या मातोश्री होत. जनाबाई यांच्या पश्चात तीन मुले, सात मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे व खापर पतवंडे असा मोठा परिवार आहे.

जनाबाई तारे यांचा 105 वा वाढदिवस नुकताच तारे कुटुंबीयांनी साजरा केला होता. यावेळी पाच पिढय़ा उपस्थित होत्या. 4 मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार, 13 मे रोजी सकाळी 9 वाजता खडवली येथे होईल तर उत्तरकार्य 17 मे रोजी सकाळी 11 वाजता खांडपे येथील निवासस्थानी होईल, अशी माहिती तारे कुटुंबीयांकडून देण्यात आली.