
मीरा-भाईंदरमध्ये मिंधे गटाला जोरदार झटका बसला आहे. महिला उपशहर संघटक कृष्ण मिश्रा यांच्यासह शिंदे गटाच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर प्रवेश केला. शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक नीलम ढवण यांच्या नेतृत्वाखाली भगवा ध्वज हाती देत सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
शिंदे गटाच्या मीरा-भाईंदर उपशहर संघटक कृष्ण मिश्रा, विभाग संघटक राधा पाठक, ममता त्रिपाठी, शाखा संघटक सरोज गुप्ता, उपविभाग संघटक रिना सिंग, मिथिलेश सोनी, खुशबू सिंह, कांचन मिश्रा, सुमन सिंह, रुबिना आलम, उमा तिवारी, संतोष रावल, रिना कदम, उपशाखा संघटक राणी मिश्रा, रिना मिश्रा, मीना पटेल, प्रिया प्रजापती, कविता सिंह, कांती रजक, अनिता निर्मल तसेच उपविभागप्रमुख मुकेश यादव, मदन पाठक, जितेंद्र पाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेनेच्या उपशहर संघटक चेतना महाले, रुचिता सावंत, विभागप्रमुख हुकूमचंद अग्रवाल तसेच महिला आघाडी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी निवडणुकांमध्ये धडा शिकवू
सत्ता आणि पैशांच्या जोरावर मिंधे गट विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचे काम करत आहे. त्यांचा हा मस्तवालपणा जनता एक ना एक दिवस नक्की उतरवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मिंध्यांना पराभवाची धूळ चारून धडा शिकवू, असा निर्धारही करण्यात आला.