चंद्रपुरात 7 दिवसांचा जनता कर्फ्यू

चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवारपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. हा कर्फ्यू 1 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. या कर्फ्यूदरम्यान किराणा, भाजीपाल्याची दुकाने बंद राहणार आहेत. कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. चंद्रपूर जिल्ह्यात रोज सरासरी दोनशे ते अडीचशे कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. इथल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा आता आठ हजारांवर गेलाय. विशेष म्हणजे या महिन्यातील हा दुसरा जनता कर्फ्यू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या