
बंगळुरूमध्ये एका महिलेवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी मिथुन वगळता इतर सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. बलात्कारानंतर महिलेकडून लुटलेले मोबाईल फोन आणि रोख पैसेही पोलिसांनी आरोपींकडून जप्त केले आहेत.
सात आरोपी मंगळवारी रात्री महिलांच्या घरी पोहोचले होते. त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगितले आणि तेथे वेश्यालय चालवले जात असल्याची माहिती मिळाल्याने आले असल्याचे सांगितले. त्यांनी घरात असलेल्या एका महिलेला आणि दोन पुरुषांना निर्दयपणे मारहाण केली.
यानंतर त्या महिलेला दुसऱ्या खोलीत ओढून नेण्यात आले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. जेव्हा तीन जण महिलेशी अत्याचार करत होते, तेव्हा टोळीतील इतर सदस्य बाहेर पहारा देत होते. टोळीने महिलेकडून 25,000 रुपये आणि दोन मोबाईल फोन लुटले. रात्री साडेबारा वाजता माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तीन आरोपींना अटक केली. उरलेले तीन आरोपी दुसऱ्या दिवशी पकडण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी मिथुनच्या शोधासाठी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पोलिसांनी हेही सांगितले की, या घटनेत काही गूढ बाबी आहेत आणि त्यांना संशय आहे की महिला काही आरोपींना आधीपासून ओळखत असावेत.




























































