उत्तरेकडे नववर्षाची सुरुवात कडाक्याच्या थंडीने

नव्या वर्षाची सुरुवात कडाक्याच्या थंडीने होणार आहे. हवामान विभागाने दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-कश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे. यापैकी अनेक राज्यांमध्ये धुके, शीत लहरचा अलर्ट दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आसाम, मेघालय, बिहार, हरयाणा, चंदिगढ, दिल्ली, हिमाचल प्रदेश घनदाट धुके दिसून येईल.