पैसे आणि निधीचे आमिष दाखवून मते मागितली जात आहेत, शरद पवार यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कामापेक्षा पैसे आणि निधीचे आमिष दाखवून मते मागितली जात आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. महायुतीमधील तीन पक्षांमध्ये पैसे किती द्यायचे, निधी किती द्यायचा यावरून चढाओढ लागली असून अशा प्रकारे अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हाच दृष्टिकोन असेल तर त्यावर भाष्य न केलेले बरे, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी आज बारामती येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पहिल्यांदाच ठिकठिकाणी गट झाल्याचे दिसत आहेत, एका पक्षातील गट दुसऱ्या पक्षासोबत जात आहेत, निवडणुकीत एकवाक्यता नाही असाच याचा अर्थ आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.