‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे प्रमुख संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडताना सबंध देशाचा संसार चालवणारी मराठय़ांची जात आहे. आरक्षण काय मागता, असे वक्तव्य केले होते.
त्यावर पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी, संभाजी भिडे वगैरे काय प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का? काहीही प्रश्न विचारायचे का? हल्ली कसेही प्रश्न विचारता. एकंदरीत दर्जा फार उतरलेला आहे, अशा शब्दांत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला झापले.