फारूख अब्दुल्ला यांच्यावर हल्ला प्रकरणी शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad pawar farooq abdullah

जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यावर जम्मूत एका लग्न समारंभात गोळीबार झाला. या घटनेनंतर खळबळ उडाली असून हल्ल्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी ही घटना अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.

शरद पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘ज्येष्ठ नेते फारूख अब्दुल्ला तसेच उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी उपस्थित असलेल्या लग्नसमारंभात झालेला गोळीबार अत्यंत चिंताजनक आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. तथापि, अशा प्रकारच्या घटना सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आणि धोकादायक ठरू शकतात.

सर्व मान्यवर सुरक्षित असल्याचे वृत्त ऐकून समाधान वाटते. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि सततच्या सुरक्षिततेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.’