शरद पवार यांना डिस्चार्ज प्रकृती उत्तम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची प्रकृती ठणठणीत झाली असून त्यांना आज रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना काही दिवस घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला असून हळूहळू ते त्यांचे दैनंदिन कामकाज आणि सार्वजनिक कार्यक्रम पुन्हा सुरू करू शकतील, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. रूबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष, मुख्य हृदयरोगतज्ञ डॉ. परवेझ ग्रँट यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली.