
नुकताच आयपीएलचा 18 वा हंगाम संपला. पंजाब किंग्जचे जेतेपदाचे स्वप्न थोडक्यात हुकले. मात्र पुढचा आयपीएल पंजाब किंग्जकाही होगा, असे भाकित वर्तवलेय शशांक सिंगने. शशांकच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर पंजाबने बंगळुरूच्या 190 धावांचा जबरदस्त पाठलाग केला, पण त्यांचा संघ अवघ्या 6 धावांनी हरला. हेझलवूडच्या पहिल्या दोन चेंडूवर मोठे फटके मारण्यात अपयशी ठरल्यामुळे पंजाबला अपेक्षित विजयी लक्ष्य गाठता आले नव्हते. मात्र पुढचा हंगाम पंजाबचाच असेल. पुढच्या वर्षी आम्ही बंगळुरूत अंतिम सामना खेळू आणि आयपीएल ट्रॉफीसुद्धा जिंकू, असा दृढ आत्मविश्वास त्याने बोलून दाखवला. त्याने आतापासून अंतिम फेरीत खेळण्याचा संकल्प केला आहे. त्याची संकल्पपूर्ती होते की नाही, ते पुढच्या वर्षीच कळू शकेल.