अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळेच अजितदादा वेगळे झाले, राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजितदादांनी राष्ट्रवादीतून वेगळे होऊन स्वतंत्र गट स्थापन करण्यामागे नेमके काय कारण होते अद्याप समोर आले नव्हते. मात्र त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एका लेखातून ते सर्वांसमोर आणले आहे. दादांच्या त्या कृतीमागे अदृश्य शक्तींचा हात होता आणि दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र याव्यात हे दादांचे स्वप्न होते, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या व षड्यंत्र रचून केलेल्या खोटय़ानाटय़ा आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता असे शिंदे यांनी म्हटले आहे. परंतु त्या अदृश्य शक्ती कोण होत्या हे मात्र त्यांनी स्पष्टपणे नमूद न करता भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

z दोन्ही राष्ट्रवादींचे 12 फेब्रुवारीला जाहीरपणे एकत्रिकरण करायचे असा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता. त्यानंतर पक्षाची धुरा अजितदादांच्या खांद्यावर द्यायची असा निर्णयही शरद पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी घेतला होता, पण मधेच दादांवर काळाने झडप घातली आणि त्यांचे एकत्रिकरणाचे स्वप्न अपुरे राहिले, असे शिंदे यांनी म्हटले आहे.