
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ २५ सप्टेंबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, शाहबाज पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेला भेट देतील. यादरम्यान ते ट्रम्प यांना भेटतील.
या बैठकीदरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर देखील उपस्थित राहणार आहे. वृत्तानुसार, पाकिस्तानमधील पूर आणि इस्रायलने कतारवर केलेल्या हल्ल्याचे परिणाम यावर या बैठकीत चर्चा केली जाईल. जिओ न्यूजने असेही वृत्त दिले आहे की, ही बैठक कतार आणि सौदी अरेबियाशी सल्लामसलत करून आयोजित केली जात आहे.