
‘बिग बॉस 13’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शहनाज गिल आज केवळ तिच्या निरागसतेसाठीच नाही, तर तिच्या प्रेरणादायी शारीरिक बदलामुळे आणि यशाुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात असताना आपली एक चुलबुली आणि काहीशी भोळी प्रतिमा निर्माण करणाऱ्या शहनाजने गेल्या काही वर्षांत स्वतःमध्ये प्रचंड बदल घडवून आणले आहेत. एकेकाळी लोक जिला तिच्या वागण्यावरून कमी लेखायचे, तिनेच आज आपल्या जिद्दीच्या जोरावर एक यशस्वी अभिनेत्री आणि निर्माती म्हणून बॉलिवूडमध्ये स्थान मिळवले आहे. शहनाजने नुकतेच इन्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती पंजाबी सूटमध्ये दिसत आहे. हा एक हेवी एम्ब्रॉयडरी असलेला इंडो-वेस्टर्न स्टाईलचा सूट आहे. हा ड्रेस फिकट चंदेरी किंवा ‘आयवरी गोल्ड’ रंगाचा आहे. यावर संपूर्णपणे बारीक टिकल्या , मणी आणि जरदोजीचे नक्षीकाम करण्यात आले आहे, ज्यामुळे त्याला एक राजेशाही लूक मिळत आहे. या ड्रेसला ‘डीप व्ही-नेक’डिझाइन आहे, जे त्याला आधुनिक आणि बोल्ड लूक देते.शहनाजने या लूकसाठी केस मोकळे सोडले असून ‘मिनिमल ज्वेलरी’ वापरली आहे. व्यावसायिक आघाडीवर ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘थँक यू फॉर कमिंग’ यांसारख्या चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली असून चाहते आता तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.




























































