शिबू सोरेन यांनी आदिवासींच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचले; संजय राऊत यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण

झारखंडमधील खासदार शिबू सोरेन यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या निधानाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी खेद व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सोरेन यांनी झारखंडचे नेतृत्व केले आणि राष्ट्रीय नेते अशी प्रतीमा तयार केली. झारखंडच्या विकासासाठी त्यांचे योगदान नेहमी स्मरणात राहील.

झारखंड हे आदिवासी आणि मागास राज्य आहे. तेथील जनता शिबू सोरेन यांना देव मानते. याचा अनुभव आम्ही घेतला आहे. राज्यसभेत त्यांची खुर्चा आपल्या शेजारीच आहे. दोन दिवसांपासून त्यांच्यी प्रकृती ढासळली होती. आज त्यांचे दुःखद निधन झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आपण सोरेन यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे संजय राऊत म्हणाले.आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी शिबू सोरेन यांनी आयुष्यभर संघर्ष केला. झारखंड राज्याच्या निर्मितीसाठीही त्यांचा संघर्ष आणि त्यांचे योगदान अमूल्य आहे. ते नेहमी स्मरणात राहणारे आहे, असेही संजय राऊत म्हणाले.