चाहत्यांना भावला नवा लूक!! शिखरच्या डोक्यावर उगवले केस

845

लॉकडाऊनमुळे  क्रिकेटचे सामने रद्द झाल्याने क्रिकेटर्स सध्या आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. बहुतेक क्रिकेटर्स सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. टीम इंडियाचा गब्बर म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटपटू शिखर धवनने नुकताच आपला नवीन लुक सोशल मीडियावर शेयर केला असून त्याचा हा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.


View this post on Instagram

Finally got some hair

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

शिखरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बुधवारी विग घालून एक फोटो शेयर केला आहे. या विगमध्ये पुढच्या बाजूला केशरी, मधल्या बाजूला लाल आणि मागच्या बाजूला हिरव्या रंगाचे केस दिसत आहे. या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये ’अखेर… माझ्या डोक्यावर नवीन केस उगवले’ असे त्याने म्हटले आहे. खरंतर असा विग चाहते नेहमी क्रिकेटच्या सामन्यादरम्यान घालताना दिसतात. पण ह्या विगमधील शिखरचा अंदाज चाहत्यांना भावला आहे. नुकतेच त्याने आपल्या घरी आलेल्या दोन नवीन पाहुण्यांची माहिती सोशल मीडियावर दिली होती. नुकतेच त्याने दोन श्वान दत्तक घेतले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या