दादा पैसे देत नाहीत भाई… कामं कशी करायची? मिंधे गटाचे सर्वच मंत्री अजित पवारांवर नाराज

ajit-pawar-eknath-shinde

लाडकी बहीण योजनेमुळे अर्थमंत्री अजित पवार यांना खर्चाची जुळवाजुळव करणे कठीण होऊन बसले आहे. त्या रागापोटी त्यांनी मिंधे गटाच्या मंत्र्यांना हैराण करून सोडले आहे. पैसा देताना अजितदादा हात आखडता घेत असल्याने मिंध्यांच्या मंत्र्यांनी आज आपले सरदार एकनाथ शिंदे यांच्याकडेच गाऱहाणे मांडले. दादा पैसाच देत नाहीत भाई… कामं कशी करायची? अशी ‘वन टू वन’ तक्रारच त्यांनी शिंदेंकडे केल्याचे सांगितले जाते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनीही आपल्या गटातील मंत्र्यांच्या खात्यांचा आढावा घेतला. एकेका मंत्र्याला बोलवून त्याच्या विभागात झालेली कामे, होत असलेली कामे आणि होणारी कामे याबद्दल त्यांनी माहिती घेतली. यावेळी प्रत्येक मंत्र्याची अजित पवारांबद्दलच नाराजी होती. अजितदादा पैसाच देत नाहीत आमच्या खात्याला, कामे होणार कशी आणि करायची कशी!…भाई तुम्हीच सांगा, अशी तक्रार त्यांनी केली. मिंधे गटाच्या मंत्र्यांनी आता कामे झाली नाहीत तर येत्या निवडणुकीला सामोरे कसे जाणार? लोकांना काय उत्तरे देणार? अशी चिंताही यावेळी व्यक्त केली. प्रत्येक मंत्री अजित पवारांबद्दल तक्रार करतोय हे पाहून यावेळी शिंदेही टेन्शनमध्ये आले होते. लवकरच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी बोलून यावर मार्ग काढू, असे आश्वासन त्यांनी मंत्र्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.