
भायखळा, माझगावमधील विविध नागरी समस्या सोडवून रहिवाशांना दिलासा द्यावा यासाठी शिवसेना उपनेते आमदार मनोज जामसुतकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱयांनी महापालिकेच्या ई विभाग कार्यालयात पालिका अधिकाऱयांची भेट घेतली. यावेळी सविस्तर चर्चा करून समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
भायखळा विधानसभेतील विविध मूलभूत नागरी समस्यांबाबत शिवसेना उपनेते-आमदार मनोज जामसुतकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक महापालिकेच्या परिमंडळ-1 च्या उपायुक्त संगीता हसनाळे आणि साहाय्यक आयुक्त सुरेश सागर तसेच सर्व विभागाचे अभियंते, अधिकारी यांच्याबरोबर ई विभाग कार्यालयात झाली. बैठकीत प्रभाग क्र. 207 ते 212 येथील मूलभूत नागरी समस्यांबाबत चर्चा करून त्या सोडवण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी भायखळा विधानसभा समन्वयक बबन गावकर, उपविभागप्रमुख राम सावंत, विजय कामतेकर, माजी नगरसेवक रमाकांत रहाटे, सहसंघटक हेमंत कदम, रवी चव्हाण, भायखळा महिला समन्वयक सुरेखा राऊत, विधानसभा संघटिका चंदना साळुंखे, उपविभाग संघटिका, माजी नगरसेविका सोनम जामसुतकर, सहसंघटिका उषा पाटोळे, शाखाप्रमुख काका चव्हाण, रमेश रावल, लिंगाप्पा चलवादी, सुहास भोसले, विनोद शिर्पे, सलीम शेख, महिला शाखा संघटिका प्रियांका टेमकर, सोनल सायगावकर, महिला शाखा समन्वयक मनीषा जांभरे, शिल्पा म्हात्रे, विद्या राबडिया, युवासेना मुंबई समन्वयक अमित जाधव व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.