विलेपार्लेतील गणेशभक्तांना शिवसेनेची अनोखी भेट, पूजा साहित्याचे घरोघरी वाटप

गणेशोत्सवाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापना पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू आहे. अशातच विलेपार्ले विधानसभेतील गणेशभक्तांना शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अनोखी भेट दिली असून घरोघरी पूजा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.

विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांच्यातर्फे गेल्या 15 वर्षांपासून गणेशभक्तांना घरोघरी पूजा साहित्याचे वाटप करण्यात येते. यंदाही गणेशभक्तांना हळद, पुंकू, लाल वस्त्र, कापूर, अत्तर अशा तब्बल 21 वस्तूंचे कीट देण्यात येणार आहे. नुकताच या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना नेते, विभागप्रमुख-आमदार अॅड. अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विधानसभा संघटक संदीप नाईक, रूपाली शिंदे, उपविभाग संघटक शुभदा पाटकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रमुख संतोष कदम, शाखाप्रमुख प्रकाश सकपाळ, शाखा संघटक अपर्णा उतेकर, नितेश गुरव, उपशाखाप्रमुख युवा चिटणीस आनंद पाठक, दीपक तांबे आदी उपस्थित होते.

 सार्वजनिक गणेश दर्शन स्पर्धा

परळ येथील सुभाष डामरे मित्र मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे शिवराज प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने मुंबई जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेश दर्शन स्पर्धा व गणराज चषक-2024चे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे संस्थापक आनंद गांवकर, संचालक सुधीर साळवी, जीवन कामत, रवींद्र कुवेसकर, संजय सावंत, महेश सावंत, मोहन चव्हाण, महेश पवार, सुनील कदम, उर्मिला पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नाना फाटक (9819301959), प्रभाकर मोरजकर (9930912255), सुवर्णा गुराम (9619188989), रवींद्र ओटवकर (9820749126) यांच्याशी संपर्क साधावा. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक सचिन पडवळ व पराग चव्हाण, मुकेश कोळी, प्रणव डामरे, अभिषेक गवाणकर, रुपेश कोचरेकर, अवधूत भिसे यांनी केले आहे.