
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात आज जोरदार इनकमिंग झाले. भाजप आणि शिंदे गटाच्या भिवंडी तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले. भिवंडी मध्यवर्ती शाखेत हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी उपनेते विश्वास थळे, ग्रामीण जिल्हाप्रमुख कुंदन पाटील, लोकसभा सहसंपर्क संघटक सोन्या पाटील, तालुकाप्रमुख करसन ठाकरे यांनी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी पिंपळास जिल्हा परिषद गटातील भाजपचे प्रकाश माळी, जगदीश पताळे, गीतांजली पताळे, शिंदे गटाच्या साईनाथ नागावकर, गणेश माळी, दीपेश म्हस्के, मयुर म्हस्के, फुलाजी म्हस्के, बाबू पाटील, अनंत म्हस्के, अशोक माळी, दर्शन माळी, सदाशिव माळी, गणेश माळी, अभिषेक म्हस्के, अनिल भोईर, संदीप पताळे, श्रावण म्हस्के, अक्षय पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करून हाती मशाल चिन्हाचा भगवा घेतला.
‘मशाल’ तेजाने उजळेल
या प्रवेशामुळे तालुक्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढली असून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मशाल चिन्ह अधिक तेजाने उजळेल असा विश्वास उपनेते थळे यांनी व्यक्त केला.


























































