महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे.
24 August
Maharashtra bandh!
महाराष्ट्र बंद!!!
महाविकासआघाडीचे ठरले. pic.twitter.com/tC8GVVgCIH— Sanjay Raut (@rautsanjay61) August 21, 2024
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, बदलापूरची घटना अतिशय नींदनीय आहे. आजच्या बैठकीत महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा झाली. बदलापूर प्रकरणी लोक रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी आंदोलन केले. पण ज्यांनी आंदोलन केले त्यांच्याविरोधात खटले दाखल केले गेले असे संजय राऊत म्हणाले.
त्यामुळे 24 ऑगस्टला आम्ही बदलापूर घटनेविरोधात महाराष्ट्र बंद पुकारला आहे. महाविकास आघाडीतले सर्व मित्र पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष हा बंद पाळतील. संपूर्ण महाराष्ट्राचे गुन्हेगारीकरण झाले आहे. राज्यात महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत आणि सरकार झोपा काढत आहे असेही राऊत म्हणाले.
#WATCH | Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, “…We had come here to discuss seat sharing but then we thought that we would not discuss seat sharing and instead discuss the law and order in the state after the Badlapur incident. The people of Maharashtra are agitated and… pic.twitter.com/4LoFpEZoly
— ANI (@ANI) August 21, 2024