
महायुती सरकारच्या हुकूमशाही कारभारामुळे नाशिक जिह्यात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त नाशिकसाठी शुक्रवारी, 12 सप्टेंबर रोजी शिवसेना, मनसे जिल्हाधिकारी कार्यालयावर संयुक्त जनआक्रोश मोर्चा काआहे, अशी माहिती दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
हनीट्रपमध्ये आजी-माजी मंत्र्यांवर कारवाई टाळून शासनाने फसवणूक केली. शहरात एमडी ड्रग्ज, अंमली पदार्थ, ऑनलाईन जुगार असे अनेक अवैध धंदे राजरोस सुरू आहेत. हत्या, बलात्कार यामुळे जनता भयभीत झाली आहे. जनतेच्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी हा जनआक्रोश मोर्चा कायात येत असून यात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, सलीम शेख यांनी केले.