
शिवसेना-‘मनसे’कडून राज्यातील हिंदी सक्ती विरोधात आंदोलन पुकारताच महायुती सरकारने माघार घेत हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला. आता 5 जुलै रोजी वरळीच्या ‘एनएससीआय’ डोममध्ये विजयी मेळावा आयोजित करण्यात आला. या विजयी मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दर्शवला आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. आम्ही सहभागी होत आहोत, त्यांनी निर्णय घेतला म्हणजे झालं, असे सांगत शरद पवार यांनी विजयी मेळाव्याला पाठिंबा दर्शवला. मात्र, माझे नियोजित कार्यक्रम त्या दिवशी ठरले आहेत. त्यामुळे मी 5 तारखेच्या कार्यक्रमाला जाणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. कुणाचं काही मत असेल तर ते आमच्या आघाडीच्या आड येणार नाही. आमचं काम सुरू आहे, असे शरद पवार म्हणाले.
विजयी मेळावा दणक्यात होणार; आवाज फक्त मराठीचाच, जय्यत तयारी, शिवसेना-‘मनसे’कडून कामाचा आढावा