शिवसेनाप्रमुखांची जन्मशताब्दी भव्यदिव्य साजरी करणार, शिवसेना भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक जिह्यात भव्यदिव्य स्वरूपात करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेना भवन येथे झालेल्या महाराष्ट्रातील शिवसेना जिल्हाप्रमुख व मुंबईतील नगरसेवक यांच्या बैठकीत पदाधिकाऱयांना याबाबत सूचना दिल्या.

प्रत्येक जिह्यात भव्य रक्तदान शिबीर, वैद्यकीय शिबीर, वक्तृत्व स्पर्धा, शालेय क्रीडा स्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धा, आंतरविद्यापीठ वाद-विवाद स्पर्धा, विचारवंतांच्या मनातील बाळासाहेब – व्याख्यानमाला, जिल्हावार – शिवसेना वर्धापन दिन, भजन स्पर्धा, वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली व्यंगचित्रे, मार्मिक-सामनातील अग्रलेख यांचे प्रदर्शन, शिवसैनिक नोंदणी अभियान आदी कार्यक्रमांचे जिह्यातील आयोजन शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, अंगिकृत संघटना या सर्वांनी एकत्र येऊन सदर कार्यक्रम भव्यदिव्य स्वरूपात करण्याच्या सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

या बैठकीला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब, उपनेते रवींद्र मिर्लेकर, अरविंद नेरकर, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना सचिव नगरसेवक साईनाथ दुर्गे, शिवसेना सचिव सुधीर साळवी आदी उपस्थित होते.

नाशिक जिल्हा संपर्क उपनेते पदी रवींद्र मिर्लेकर

शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्हा संपर्क उपनेते पदी रवींद्र मिर्लेकर यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

कार्यक्रमांच्या नियोजनासाठी पदाधिकाऱ्यांना जिल्हानिहाय जबाबदारी

ठाणे – धर्मेंद्र राजाराम काळे,  पालघर – चिंतामणी दत्ताराम निवाटे, नाशिक – अॅड. सुहास चंद्रकांत वाडकर, धुळे – तुळशीराम धोंडीबा शिंदे, नंदुरबार – जितेंद्र हिरालाल वळवी, जळगाव – प्रमोद पांडुरंग सावंत, अहिल्यानगर – सदा परब, जीशान चंगेज मुलतानी, जालना – गीतेश विनायक राऊत, हिंगोली – दीपक राजाराम सावंत, बीड – विश्वास तुकाराम शिंदे, नांदेड – सुनील सयाजी मोरे, अमरावती – रमाकांत सखाराम रहाटे, अकोला – अनिल लक्ष्मण कदम, वाशीम – हरी जगन्नाथ शास्त्राr, बुलढाणा – जोसेफ मनवेल कोळी, चंद्रपूर – निशिकांत गोविंद शिंदे, भंडारा – राजू मुल्ला, गोंदिया – शशिकांत झोरे, यवतमाळ – विजय जगन्नाथ भणगे, नागपूर – किरण प्रभाकर तावडे, वर्धा – सचिन देवदास पडवळ, गडचिरोली – विठ्ठल गोविंद लोकरे, रायगड – अंकित सुनील प्रभू, रत्नागिरी – सचिन बाळकृष्ण पाटील, सिंधुदुर्ग – सुरेश पाटील, पुणे – सोमनाथ सांगळे, सातारा – सत्यवान उभे, सांगली – स्वप्नील पुंजिर, सोलापूर – पैलास पाठक, जगदीश थैईवालापिल, कोल्हापूर – उदय दळवी, छत्रपती संभाजीनगर – आशीष चेंबूरकर, परभणी – राजू पाटील, धाराशीव – सुनील छबुलाल पाटील, लातूर – मुकेश साळुंके.